रात्री
झोपताना सकाळचा किती वाजताचा गजर लावायचा
ह्या संभ्र्मात असलेल्या
मृण्मयीने शेवटी ५ चे काटे फिरवले. बराच वेळ काही तिला झोप लागली
नाही. कारण सकाळी उटल्यावर काय काय
करायचं ह्या गोष्टीची उजळणी चालु होती बहुधा तिच्या डोक्यात . नंतर कशीबशी ती झोपली. पहाटेची प्रसन्न वेळ, पक्ष्यांची किलबिल, दुधवाल्या काकांचा आवाज , रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचा आवाज यातील प्रत्येक गोष्टींचा आवाज
तिच्या कानांवर पडत होता. पण ती वाट
बघत होती
गजराची. त्या गजराच्या आरोळीने शेवटी मृण्मयी जागी झाली. हळुहळु स्वःताला सावरत दोन्ही हातांनी केस बांधत शरीराचा पुर्ण भार हा दोन्ही
पायांवर देत ती उठली आणि
उटतच तिने स्वयंपाक घराकडे मोर्चा वळवला. रात्री नियोजन केल्याप्रमाणे fresh होऊन
तिची हलचाल सुरु झाली. आंघोळ झाल्यावर मात्र तिने पुरळपोळ्या आणि देवांची पुजा सुध्दा केली. अगरबत्तीचा सुवास सर्व घरात दरवळत होता. तेवढ्याच
७.३० चा अजुन गजर वाजला. तो होता तिच्या नवर्याचा म्हणजेच विलासचा. गजर वाजुन बराच वेळ झाला
होता पण विलास अजुन उटला नव्हता. तेवढ्यात मृण्मयीचा धावा
सुरु झाल्या. अरे ए ! विलास उठ ना. बघ जरा किती
वाजले आहेत. उठ बरं
लवकर आवार निघायचं आहे ९ वाजता.
हा गडी
कासवाच्या गतीने अगदी संथपणे आवरत होता आणि मृण्मयी
मध्ये परत परत तिची
कँसेट चालु ठेवत होती. स्वयंपाकघरातील सर्व आवरुन तिच आवरण्यासाठी बेडरूममध्ये गेली.
विलासची आंघोळ होईपर्यंत हि तयार होती.
विलास:
हे काय
! आज साडी?
मृण्मयी
: हो , आज बैलपोळा
आहे ना!
विलास
: काय ?
मृण्मयी
: (हसत हसत)अरे , चेष्टा केली रे.आज वटपौर्णिमा आहे. (दोघेही
एकमेकांना लुक देतात)
तो ही तयार
होऊन तिला घेऊन जवळच असलेल्या वडाच्या झाडाजवळ आला. मृण्मयीची हि दुसरी वटपौर्णिमा होती
म्हणून तिला जेवढ माहिती होत तेवढ
ती करत
होती. तिथे आलेल्या काही बायका मनोभावे पुजा करत होत्या तर काही बायका असला नवरा मिळाला म्हणून फेऱ्या मारत झाडाकडे बघुन खडे फोडत
होत्या तर काही बायका ह्या दोन्ही पण वर्गातील
नव्हत्या. सांगायचं झालं तर असं कि बाकीच्या बायका काय करत आहेत
,कोणती साडी घातली आहे , मेकप काय केला आहे. फेऱ्या
मारता मारता हे सगळं
करताना त्यांना समजतच नसते कि आपल्या
धाग्याचा दोरिने दुसऱ्याच्या नवराचा जीव चालला आहे. काही बायका अश्या पण असतात कि नवर्याने दारु पिऊन मार
झोड जरी
केली तरी ह्या त्याच्यासाठी पुजा
करतील फारच नवल वाटत
त्यानंच. काही बायका तर officeच ID Cardच गळ्यात घालुन आल्या होत्या असं वाटत
होत कि मंगळसुत्राची जागा
आता ID Card ने घेतली. पण असो, पु.ल.देशपांडेनी म्हणूनच तर म्हणलं आहे “व्यक्ती तितक्या प्रवृत्ती”. जेव्हा
ह्याच बायका नौकरी , मुलं
, घर संभाळुन आपली संस्कृती जपत असतात तेव्हा त्यांचा
अभिमान वाटतो. घरी आल्यावर मृण्मयी office ला जाण्यासाठी तयार होत होती.
तो पर्यंत विलासने तिच्यासाठी ताट
तयार करुन तिला स्वःताच्या हाताने
भरवू लागला. जेवण झाल्यावर दोघेही घराच्या बाहेर पडले. आयुष्य जगताना एक समजुतदार जोडीदार असावा म्हणजे
अवघड गोष्टी हि सुलभ होतात.तर अशाप्रकारे होती
मृण्मयीची वटपौर्णिमा.
वृषाली सुनगार-करपे