Wednesday, 25 December 2019

अंतर



भाग १ : वेळ


Airport  वर निघायची वेळ झालेली तरीही शाल्मली अजून bedroom मध्येच. सारंगचा चेहरा हा काहीसा धीर गंभीर होता. हताशपणे तो दिवाणखाल्यातील खिडकीच्या बाहेर बघत होता. शाल्मली सगळं सामान घेऊन काहीश्या जड पावलांनीच बाहेर आली. सारंगला असं एकटं सोडून जाणे तिच्या जीवावर आलेलं. तिला बाहेर देशात office च्या कामानिमित्ताने जवळ जवळ दोन वर्ष जायाचे होते आणि म्हणूनचं ती अस्वस्थ होती. तिच्या मनात असंख्य प्रश्नाचे काहूर माजलेले आणि सोबतच डोळ्यांत पाणी. ती बाहेर आलेली त्याला समजलं तसा तो भानावर आला तिच्या हातातील सामान घेत बाहेर ठेवलं. दोघे हि एकमेकांना नजर चुकवत होते. घाईगडबडीने त्याने कुलूप आणि चावी हातात घेतली तोंडावर हात फिरवत डोक्यावर टोपी घातली. कुणी काहीच बोलत नव्हतं. आज कधी नाही ते वेळ हा जोरात पळत आहे याची जाणीव त्यांना झाली. न राहवून तिनेच त्याचा हात हातात घेतला तसं त्याने तिला आपल्या बहुकोशात ओढले . दोघांच्या हि रडण्याला सीमा नव्हती. रोजचे रुसवे फुगवे , एकमेकांवर कुरघोड्या , स्वयंपाकात मदत करताना ऑफिस मधले किस्से share करणे , घराच्या स्वच्छता वरून उडणारे खटके , खूपच राग आला कि तू मूर्खच आहे आणि तू माकड हे सगळं आता होणार नव्हतं. परत वेळेचं भान ठेवत सारंगनेच तिला शांत केलं. दोघांनीही गळा भेट घेतली आणि घराला कुलूप लावत दोघे खाली उतरले.  सारंग तिला सोडायला airport न जाता थेट तिच्या मैत्रिणीच्या room वर तिला घेऊन गेला. तिथे शाल्मलीच्या घरचे सगळे आलेले. तिच्या मैत्रिणीच्या इमारतीच्या खाली दोघे हि बराच वेळ काही न बोलता उभे होते शेवटी सारंगनेच शांतता मोडली आणि बोला ," चाल मी निघतो" तिने फक्त "हम्म" केलं. तो तिला तिथे सोडून परत घरी येणार होता. तिला तिथे सोडणे त्याला सोईस्कर वाटत नव्हते आणि कुणावर त्याचा विश्वास हि नव्हता. रमा सोडली तर. रमा हि दोघांची कॉमन मैत्रीण कॉलेज पासून ते तिघे एकत्र होते आणि शाल्मली व तिच्या घरचे हे रमाच्या रूम वर आले होते.
क्रमश:
सौ. वृषाली सुनगार-करपे