बघतो मी तुला उमलताना
रोज नव्याने बहरताना
दिवसाणित रुप तुझे हे खुलताना
बघतो मी तुला उमलताना
रोज नव्याने बहरताना
परिचित होतीस तु मजसाठी
अस्तित्व तुझे नव्याने आज भासताना
बघतो मी तुला उमलताना
रोज नव्याने बहरताना
दिले असे वरदान देवाने
कसे समस्त स्त्री जातीला
नाळ हि जोडली फक्त मायेच्या
गर्भाला
बघतो मी तुला उमलताना
रोज नव्याने बहरताना
लेकराची माझ्या माय होताना
वृषाली सुनगार - करपे
No comments:
Post a Comment