Thursday, 22 March 2018

पहिला पाऊस

आठवणीच्या हिंदोळ्यामध्ये 
रमले मन तुझ्यामध्ये

साद घालती मना तुझे हे येणे
मग वाटे चिंब भिजावे  तुझ्यासोबत 

बरसती नेहमीच सरी ह्या बेधुंद
घेऊनी येती कटु, गोड अगणित धारा 

असाचं पहिला पाऊस हृदयात जपलेला 
अन् नकळत डोळ्यांतुन बरसलेला...

वृषाली सुनगार करपे

1 comment: